संशयी नेत्री
संशयी नेत्री संशय या विषयामध्ये मी नेत्र या एलिमेंटचा भाग दाखवला आहे. संशय हे दोन प्रकारचे असतात, चांगला आणि वाईट, नेत्राच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट पाहतो आणि तय बघण्यावर आपन एक अनुमान ठरवतो. फक्त बघण्यावरून ! त्या विषयाच्या मुळाशी न जाता आपण एखाद्या गोष्टीचा खोलवर विचार करतो. एकप्रकारे खोल विहिरच..! मी चित्रामध्ये नेत्राचा भाग खोल अंधार विहिरिसारखा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. संशय हा काहीसा मला या पद्धतीने जाणवतो। त्याचा आपण फक्त अंदाज घेऊन त्यामध्ये उतरातो. या चित्रामध्ये लाल रेषा दोरी हे ऋणानुबंधन म्हणुन दाखवले आहे. या संशयामध्ये ते नात (ऋणानुबंधन) तुटतात आणि खोल अंधारात ती रेषा नाहीशी होते.